Wed. Apr 1st, 2026

जुन्नर: अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आज मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. डुंबरवाडी गावच्या हद्दीत हॉटेल अभिजित जवळ मजुरांनी भरलेली पिकअप आणि भरधाव ट्रक यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यातील मजूर रस्त्यावर फेकले गेले.

मजुरांचे वाहन ओतूरकडून आळेफाट्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, ओतूर पोलीस आणि डुंबरवाडी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने ओतूर आणि आळेफाटा येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, मात्र प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे. गाड्यांचा अतिवेग हेच या अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे बोलले जात असून, ओतूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!