महासंगम न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर: संगमनेर शहरात एका संस्थेत मजुरी करणाऱ्या महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने ४ एप्रिल २०२५ पासून २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कॉलेजमधील एका खोलीत तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले. हे कॉलेज भाजपशी संबंधित एका पदाधिकाऱ्याचे असल्याचे वृत्त आहे.
एका तीस वर्षीय महिलेने याप्रकरणी आरोपीविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चांगुलपणाचा आव आणत आरोपीने फिर्यादी महिलेचा गैरफायदा घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, या प्रकाराबद्दल कोणाकडे तक्रार केल्यास फाशी घेऊन ‘सुसाईड नोट’मध्ये तिचे नाव टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती, असेही पीडितेने नमूद केले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचे पूर्ण नाव अद्याप उपलब्ध झालेले नाही. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९१३/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६२(२)(m) आणि ३५२(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तपासादरम्यान या संदर्भातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
