Wed. Apr 1st, 2026

संगमनेर:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव समिती’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अमोल डुकरे यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे भव्य नियोजन केले जाणार आहे.

या नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून दीपक वन्नम आणि प्रकाश गायकवाड यांची निवड झाली आहे. उत्सवाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्याध्यक्ष म्हणून दत्तू नाईक, संजय सोनवणे आणि दीपक साळुंके कार्यभार सांभाळतील. समितीच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी खजिनदार राजू सातपुते, अमित चव्हाण, भाऊसाहेब हासे आणि फैसल सय्यद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपत आणि सर्व शिवप्रेमींना एकत्र घेऊन हा उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. या निवडीच्या वेळी उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख यांच्यासह अक्षय गाडे, वैभव अभंग, संभव लोढा, अभिषेक साबळे, अशोक बढे, रवी गिरी, रहीम बेग, परवेझ शेख, प्रवीण चव्हाण आणि इतर सर्व शिवसैनिक व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच या उत्सवाच्या कार्यक्रमांची अधिकृत रूपरेषा जाहीर केली जाणार आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!