Fri. Jun 5th, 2026

पुणे:

जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रसेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. तांबे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. तांबे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. दुर्गाताई तांबे यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याला डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश ठाकूर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य, साजदा निहाल अहमद, डॉ. भीमराव आंबेडकर, हेमंत नाईकनवरे, जयवंत पाटील, अजित शिंदे, राजा कांदळकर, अतुल देशमुख, जाकीर अत्तार, अरविंद सावला आणि सुनील यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध कवी प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनप्रवासाचे विविध पैलू उलगडले, ज्यामध्ये त्यांनी डॉ. तांबे यांच्या साधेपणाचे आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले.

या वेळी हिरालाल पगडाल, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह संगमनेर येथील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती आणि जयहिंद युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या वैचारिक जडणघडणीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणापासूनच्या पुरोगामी वातावरणाचा आणि महात्मा फुलेंच्या विचारांचा आपल्यावर मोठा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संगमनेरमधील प्रॅक्टिस, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, बी. जे. खताळ पाटील आणि भास्करराव दुर्वे नाना यांच्याकडून मिळालेले राजकारणाचे धडे आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील कार्याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. आपण लोकशाही, राज्यघटना आणि विज्ञानवादी समाज घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!