Wed. Apr 1st, 2026

संगमनेर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान युवा कार्यकर्ते आणि युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी संगमनेर नगर पालिका निवडणूकीसाठी प्रभाग क्र. १३ (सर्वसाधारण पुरुष गट) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शनिवारी (दि. १५) अमोल डुकरे यांनी जरी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असला तरी, त्यांची उमेदवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जवळपास निश्चित झाल्याची जोरदार चर्चा संगमनेर शहरात सुरू आहे. यामुळे प्रभाग क्र. १३ मध्ये ‘मशाल’ चिन्हाची धमक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

डुकरे हे संगमनेर शहरातील मानाच्या पहिल्या गणपतीचे, श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष असून, ते माजी नगरसेवक स्व. दत्तात्रय डुकरे (पाथरवट) यांचे नातू आहेत. या राजकीय वारशामुळे त्यांना स्थानिक नागरिक आणि युवा-वयस्कर मतदारांमध्ये चांगली ओळख आहे. अमोल डुकरे यांनी शहर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन प्रभाग १३ मधील रंगारगल्ली, चव्हाणपुरा, साळीवाडा, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा यांसह इतर भागांमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) काम केले असून, पक्षाचे ‘मशाल’ चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे.

या घडामोडींमुळे अमोल डुकरे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्र. १३ मधील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!