
संगमनेरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात
संगमनेर तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले; मात्र जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करणारे नेतृत्व म्हणून आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांचे नाव आज ठळकपणे पुढे येत आहे. शांत स्वभाव, संयमी नेतृत्व, सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ आणि विकासासाठी सातत्याने सुरू असलेले प्रयत्न यामुळे अमोलभाऊंनी अल्पावधीतच जनतेच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे.
धांदरफळ खुर्द येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमोलभाऊंनी संघर्षातून स्वतःचा राजकीय प्रवास उभा केला. कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना केवळ जिद्द, मेहनत आणि समाजसेवेच्या बळावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. लहानपणापासूनच समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती लोकांना भावली.
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरच्या जनतेने परिवर्तनाचा कौल देत अमोलभाऊ खताळ पाटील यांना भरघोस मतांनी विजयी केले. अत्यंत कमी कालावधीत गावोगावी जाऊन त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. त्यांच्या साधेपणाने आणि प्रामाणिक स्वभावाने मतदारांचा विश्वास जिंकला. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नव्हता, तर तो सर्वसामान्यांच्या स्वाभिमानाचा विजय मानला जात आहे.
आमदार झाल्यानंतर अमोलभाऊंनी विकासालाच आपले प्रमुख ध्येय मानले आहे. तालुक्यातील पाणीप्रश्न, रस्त्यांची कामे, शिक्षण, आरोग्य, शेती आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती या विषयांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुमित्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगमनेरसाठी विविध विकासकामांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
गेल्या काही महिन्यांत तालुक्यात सुरू झालेली विकासकामे ही येणाऱ्या मोठ्या परिवर्तनाची सुरुवात मानली जात आहे. जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी तत्पर राहणारा आणि दिवस-रात्र उपलब्ध असणारा आमदार अशी अमोलभाऊंची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात शांतता आहे, संयमात ताकद आहे आणि स्वाभिमानात जनतेसाठी लढण्याची जिद्द आहे.
आज संगमनेर तालुक्याला विकासाची नवी दिशा देणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी झटणारे नेतृत्व लाभले आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच संगमनेरच्या जनतेच्या मनातून आज एकच घोषणा घुमताना दिसत आहे —
“आता थांबायचं नाय!”
🚩 विकासासाठी झटणारा — आता थांबायचं नाय!
🚩 जनतेचा आधार — आता थांबायचं नाय!
🚩 हक्कासाठी लढणारा — आता थांबायचं नाय!
🚩 गावागावात पोहोचणारा — आता थांबायचं नाय!
🚩 तरुणाईचा आवाज — आता थांबायचं नाय!
🚩 संगमनेरचा अभिमान — आता थांबायचं नाय!
आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या हातून संगमनेरचा विकास अधिक वेगाने घडत राहो आणि तालुका महाराष्ट्रात आदर्श म्हणून ओळखला जावो, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
– शब्दांकन – राहुल सोमवंशी (जहागिरदार)
