संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील एका १८ वर्षीय तरुणाचा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैभव विलास कदम (वय १८, रा. देवगड वस्ती, निमगाव टेंभी) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
एका अपघातात वैभव गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ५ जून २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या मेमोच्या आधारे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. के. खेमनर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
