Fri. May 29th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील मोधळवाडी घाटात मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. पिंपळगाव देपा शिवारातील या घाटात भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत चुलती आणि पुतणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

जया दत्तात्रय थोरात (वय २९) आणि अस्मिता दादाभाऊ थोरात (वय १६, दोन्ही रा. मोधळवाडी) अशी मृतांची नावे असून, या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जया आणि अस्मिता या दोघी दुचाकीवरून मोधळवाडी घाट उतरत असताना समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघीही टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच अंत झाला.

अपघातानंतर चालक आपला टेम्पो सोडून घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत घारगाव पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टेम्पो ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी घारगाव पोलीस फरार चालकाचा शोध घेत असून एकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या निधनामुळे मोधळवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!