Sat. Jun 13th, 2026

संगमनेर:

शहरात सातत्याने गंभीर गुन्हे करत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या राहुल भारत सोनवणे (वय २४, रा. अकोले नाका, संगमनेर) या सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी अखेर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

आरोपी राहुल सोनवणे याच्याविरुद्ध मारहाण, लुटमार, जबरी चोरी आणि घातक शस्त्रांनी वार करणे यांसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया व हद्दपारीच्या प्रस्तावांना न जुमानता त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्याच्या वाढत्या दहशतीमुळे शहरात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समिर बारवकर यांनी राहुलविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये धोकादायक व्यक्ती म्हणून स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन कारागृहात रवाना केले.

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. शहरातील इतरही सराईत गुन्हेगारांची माहिती सध्या संकलित केली जात असून, त्यांच्यावरही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!