Fri. May 29th, 2026

संगमनेर –

शहरातील दिल्ली नाका परिसरात मध्यरात्री एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. आयशर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भेळीच्या हातगाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. छत्रपती संभाजीनगरवरून येणाऱ्या आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रक थेट हातगाडीवर जाऊन धडकला. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ बाहेर आले. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातात भेळीच्या हातगाडीचे व आयशर ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!