Fri. May 29th, 2026

अहिल्यानगर:

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नियमित प्रशिक्षणादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्मोक हँडग्रेनेडचे प्रात्यक्षिक सुरू असताना अचानक त्याचा स्फोट झाला.

या भीषण अपघातात शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

मार्गदर्शनानुसार जवानाने ग्रेनेडची पिन काढली, मात्र त्याच वेळी हातातील लिव्हर अचानक निसटल्याने ग्रेनेडचा हातातच स्फोट झाला. या अपघातात दोघांच्या हाताच्या बोटांना अत्यंत गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. जखमींमधील काही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशिक्षण प्रक्रियेत अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या जातील. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, प्रशिक्षणादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्फोटक साहित्याच्या सुरक्षिततेचा सखोल आढावा घेतला जात आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!