Fri. Jun 19th, 2026

संगमनेर:

संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील सुकेवाडी रोड येथे अनिकेत अशोक इथापे यांनी पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि प्रशासनाने नोटीस बजावलेली असतानाही बेकायदेशीरपणे पाच मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. या धोकादायक अवैध बांधकामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, याप्रकरणी इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना दोन पत्रे देऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप संगमनेर शहर पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

नगरपालिका प्रशासनाने सर्वे नंबर १५३/१/१ येथील या अनधिकृत बांधकामाला स्थगिती देण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५४ अन्वये नोटीस बजावली होती, मात्र बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. ५ जून २०२६ रोजी पालिकेच्या पथकाने पाहणी केली असता पाचव्या मजल्याचे काम वेगात सुरू असल्याचे आणि सिमेंट ब्लॉक शेजारील इमारतीवर व सार्वजनिक रस्त्यावर पडत असल्याचे दिसून आले.

या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालिकेने रचना सहाय्यक वैष्णवी गडाख आणि सहाय्यक नगररचनाकार ओंकार सहाणे यांना प्राधिकृत केले आहे.

सध्या नगराध्यक्षांनी शहरात अतिक्रमण आणि बेकायदेशीर कामांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून, पालिकेने पत्र देऊनही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!