Sat. May 30th, 2026

संगमनेर:

येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दळवी असे मृत रुग्णाचे नाव असून, त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे आणि डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दत्तात्रय दळवी यांना १ मार्च २०२५ रोजी छातीत दुखू लागल्याने या रुग्णालयात दाखल केले होते. तेथे स्टेन टाकल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी त्यांच्या हाताला गँगरींग झाल्याचे समोर आले. या काळात डॉक्टरांनी तज्ज्ञांचा सल्ला न घेता पैशांची मोठी मागणी केली, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आधीच परस्पर लाटल्याचेही निदर्शनास आले.

पुढील उपचारांसाठी रुग्णाला नाशिक आणि त्यानंतर घोटी येथील रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु किडनी निकामी झाल्यामुळे २२ मार्च २०२५ रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशी समितीत सोनांबेकर हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि डॉ. अभिजीत कोरडे हे रुग्ण मृत्यूस जबाबदार असल्याचे सिद्ध झाले असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!