Sat. May 30th, 2026

संगमनेर: 

लायन्स क्लब संगमनेर सफायरतर्फे उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संगमनेरमधील शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे दोन हजार धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नवा इतिहास घडविला. ७ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती.

लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत ‘प्रत्येक रनर हा विनर’ ही संकल्पना राबवण्यात आली होती. त्यानुसार स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी, निरोगी आयुष्यासाठी धावण्यासारख्या व्यायामाची सवय लागावी आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढावी हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

या उपक्रमासाठी मालपाणी उद्योग समूह, स्वदेश उद्योग समूह आणि समता पतसंस्थेचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष कल्याण कासट, सचिव सुमीत मणियार, खजिनदार नामदेव मुळे आणि प्रकल्प प्रमुख सुनीता मालपाणी यांच्यासह संपूर्ण प्रकल्प समितीने विशेष परिश्रम घेतले. संगमनेरकरांच्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल राजेश अग्रवाल यांनी क्लबच्या नियोजनाची प्रशंसा केली.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!