Fri. May 29th, 2026

संगमनेर:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर येथील अलकानगरमध्ये रविवारी भव्य शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर उत्साहात पार पडले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील तसेच उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित या शिबिरात नागरिकांना विनामूल्य ओळखपत्र दुरुस्ती, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्डातील त्रुटी दूर करण्याबाबत मार्गदर्शन व नोंदणी करण्यात आली.

खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सुनील शिंदे, सूर्यकांत शिंदे आणि झिशान चंगेज मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले. उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या सूचनेनुसार शहर प्रमुख फैसल सय्यद व अमित चव्हाण यांनी याचे नियोजन केले होते.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी शिवसेनेचे सामाजिक कार्य अधिक बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला. शिबिरात गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा करून तयार झालेली नवीन रेशन कार्ड २५ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच रेशन कार्डाचा १२ अंकी कोड, नवीन मतदार नोंदणी आणि एसआयआर नोंदणीबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. अमर कतारी यांनी यावेळी नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमाचे स्वागत शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन फैसल सय्यद यांनी केले. या उपक्रमाचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे आणि वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख यांनी कौतुक केले. याप्रसंगी संघटक दीपक साळुंके, समन्वयक बाळासाहेब घोडके, माजी शहरप्रमुख पप्पू कानकाटे, विजय सातपुते, संभव लोढा, प्रकाश गायकवाड, कैलास गायके, नितीन पारखे, लिंगमूर्ती चिंता, अमोल डुकरे, भाऊसाहेब वराळे, परवेज शेख, इरफान सय्यद, जमीर करीम शेख, अजीम अत्तार, मुसा कासम पठाण, फाईक इम्तियाज शेख, नईम शादाब पठाण, इम्रान अय्युब सय्यद, अतिक फारुक पटेल, मतीन याकूब शेख, शाहिद हसन बेपारी, अकिब महम्मद सय्यद, मोईन नईम पिंजारी, रिजवान सय्यद, अरकान सय्यद आणि सहा अंगणवाडी सेविकांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!