Sat. Jun 13th, 2026

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात वीज चोरी प्रकरणावरून एका हॉटेल चालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गणेश माधव दातीर या कंत्राटी वायरमनला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा रचून अटक केली.

कोल्हेवाडी रोड परिसरातील एका नामांकित हॉटेल चालकाची डीपीवरून चोरलेली वीज पकडल्यानंतर, वायरमन दातीर याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. हॉटेल चालकाने सुरुवातीला पैसे देण्याचे टाळले, मात्र दातीर याने पैशांसाठी वारंवार तगादा लावून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे हॉटेल चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीची शहानिशा करून पथकाने आज दुपारी संगमनेरात ही धडक कारवाई केली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!