राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी, (३० ऑक्टोबर) सकाळी ९.०० वाजता होणार आहे.
कारखान्याचे चेअरमन, लोकनेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडेल.
यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, आणि डॉ. जयश्री थोरात हे देखील उपस्थित राहतील. व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी ही माहिती दिली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या कारखान्याने मागील हंगामात ऊस उत्पादकांना रु. ३२००/- प्रति टन इतका विक्रमी भाव दिला होता, अशी माहिती व्हा. चेअरमन घुले यांनी दिली.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि सर्व संचालक मंडळाने तालुक्यातील सर्व सभासद, शेतकरी आणि ऊस उत्पादक बांधवांना या महत्त्वपूर्ण शुभारंभ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.