Fri. May 29th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर 

संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व १५ प्रभागांतील मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीनंतर आता शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर नागरिकांनी तसेच इच्छुक नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मिळून एकूण १७३० हरकती दाखल केल्या होत्या. प्रामुख्याने नावे दुसऱ्या प्रभागात असणे, एकाच कुटुंबातील नावे वेगळ्या प्रभागात असणे, किंवा काही नागरिकांनी स्वतः दुसऱ्या प्रभागात नावे समाविष्ट करणे अशा स्वरूपाच्या या हरकती होत्या.

या हरकती ‘अ’ आणि ‘ब’ गटात विभागल्या गेल्या होत्या. पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्काळ काम करून बहुतांश हरकतींवर कार्यवाही केल्यामुळे, सुनावणीसाठी केवळ एक हजार हरकती शिल्लक राहिल्या होत्या.

प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर प्रांत कार्यालयात मंगळवारी (दि. २८) दुपारी या हरकतींवर सुनावणी झाली. यासाठी एक हजार नागरिकांना नोटीस बजावण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात केवळ शंभरच्या आसपास नागरिक उपस्थित राहिले. पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यावेळी उपस्थित होत्या. ही सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे, आता सर्व नागरिकांचे लक्ष ३१ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे लागले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!