Sat. May 30th, 2026

 

संगमनेर –

राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे नाना स्मारक येथे रविवारी तालुकाध्यक्ष राम चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाची विचारधारा, समाजप्रबोधन, युवक संघटन आणि संविधान मूल्यांच्या संरक्षणासह लोकशाही बळकटीकरणावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राम चन्ना यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, छात्र भारती संघटनेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिकेत घुले यांचाही राष्ट्र सेवा दलाच्या वतीने गौरव करण्यात आला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात संगमनेर तालुक्यात संघटनेचा विस्तार करण्याचा संकल्प सोडला. सामाजिक, शैक्षणिक आणि लोकजागृतीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला हिरालाल पगडाल, राजा अवसक, सिताराम राऊत, समीर लामखडे, संदीप काकड, रजत अवसक, उज्वला कर्डिले, प्रा. बेनके, बंटी साळवे, नईम इनामदार, अर्जुन वाळके आणि श्रीनिवास पगडाल सर यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या ध्येयधोरणांशी निष्ठा राखून कार्य करण्याची ग्वाही देत बैठकीचा समारोप करण्यात आला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!