Sat. May 30th, 2026

अकोले:

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ ते १४ एप्रिल २०२६ या काळात ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

संयुक्त जयंती महोत्सव समिती आणि बळीराजा अभ्यास मंडळ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानांसह महानाट्याची मेजवानी मिळणार आहे.

व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ शेती आणि शेतकऱ्यांच्या आव्हानांवर भाष्य करतील, तर दुसऱ्या दिवशी डॉ. स्वप्नील चौधरी ‘चल दंगल समजून घेऊ’ या विषयावर प्रबोधन करतील. तिसऱ्या दिवशी ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज वारकरी संप्रदायाची समतेची शिकवण उलगडून सांगणार आहेत.

या सोहळ्याचा समारोप १४ एप्रिल रोजी हैदराबाद येथील कलाकारांनी साकारलेल्या ‘संघम् शरणम् गच्छामि’ या महानाट्याने होणार आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता सुरू होणाऱ्या या ज्ञानयज्ञाचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!