Fri. May 29th, 2026

संगमनेर:

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील दिग्गज कलाकार रघुवीर खेडकर यांना येत्या २५ मे रोजी देशाच्या प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने या सोहळ्याचे अधिकृत नियोजन जाहीर केले असून, अवर गृहसचिव कमलेश रबिदास यांनी यासंदर्भातील माहिती पत्राद्वारे कळवली आहे.

राष्ट्रपती भवनात आयोजित या सोहळ्याचे स्वरूप अत्यंत भव्य असणार आहे. २५ मे रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाची रंगीत तालीम पार पडेल, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेडकर यांना हा सन्मान प्रदान केला जाईल.

विशेष म्हणजे, तमाशा कलेच्या क्षेत्रात पद्म पुरस्कार मिळवणारे रघुवीर खेडकर हे पहिलेच कलाकार ठरले असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोककला विश्वात आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खेडकर यांच्यासोबत त्यांचे मानस बंधू डॉ. संतोष खेडलेकर आणि व्यवस्थापक शफी शेख हे दिल्लीला उपस्थित राहणार आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!