Fri. May 29th, 2026

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातून विनापरवाना वृक्षतोड करून बेकायदेशीररीत्या लाकूड वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर संगमनेर वनविभागाने सापळा रचत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन पिकअप वाहने ताब्यात घेण्यात आली असून २ लाकूड व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथून अनधिकृत लाकूड वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप येत असल्याची माहिती अहिल्यानगर येथील उपवनसंरक्षक तसेच विभागीय वन अधिकारी (दक्षता) नाशिक यांना गुप्त माहिती मिळाली त्यांनी तात्काळ सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती नम्रता हिरे यांच्यासह वनपाल वाय. आर. परते, तसेच वनरक्षक एस. एम. पारधी यांच्या पथकाने घुलेवाडी फाटा येथे सापळा रचला.

त्याच दरम्यान निमोन वरून संगमनेरकडे महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक MH-15 BJ हीच वनविभागाच्या पथकाने अडविले असता या पिकअपमध्ये निमोनचा लाकूड व्यापारी फैजान इस्माईल अत्तार, तसेच दुसरे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH-15 BJ 1553 यामध्ये इस्तीयाक मुस्ताक अत्तार बसलेले होते त्यांच्याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करत त्यांच्याकडे लाकूड वाहतूक परवाना आहे का याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे तपासणीत उघड झाले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल करून दोन्ही लाकडांनी भरलेली पिकअप वाहने ताब्यात घेतली

या प्रकरणाचा तपास संगमनेर भाग-२ च्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती नम्रता हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संगमनेर वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पर्यावरण संरक्षणासाठी वन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र या कारवाईवरून दिसून येत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!