Sat. May 30th, 2026

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नरसिंह देशमुख यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली आता अहिल्यानगर येथील ए. एच. टी. यु. शाखेकडे झाली असून, त्यांच्याकडे पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

देशमुख यांच्या रिक्त जागेवर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा अंतर्गत ९ अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये सहा पोलीस निरीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

इतर बदल्या पुढील प्रमाणे….

 * संतोष खेडकर (जिल्हा विशेष शाखा) → पारनेर पोलीस ठाणे

 * जगदीश भांबळ (नियंत्रण कक्ष) → तोफखाना पोलीस ठाणे

 * आनंद कोकरे (तोफखाना पोलीस ठाणे) → अहिल्यानगर मानव संसाधन विभाग

 * संतोष भंडारे (बेलवंडी पोलीस ठाणे) → जिल्हा विशेष शाखा

 * नंदकुमार सोनवलकर (जामखेड पोलीस ठाणे) → बेलवंडी पोलीस ठाणे

 * किशोर पवार (कोपरगाव शहर पोलीस ठाणे) → राजुर पोलीस ठाणे

 * दीपक सरोदे (राजुर पोलीस ठाणे) → पारनेर पोलीस ठाणे

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!