Wed. Apr 1st, 2026

संगमनेर: पंकज पडवळ

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा संदीप खताळ (राहणे) यांच्यात होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ महिलांनी २९ अर्ज दाखल केले आहे. या महत्त्वपूर्ण लढतीमुळे संगमनेरच्या राजकारणात दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाविकास आघाडी पुरस्कृत ‘संगमनेर सेवा समिती’ने आपली संपूर्ण तयारी दर्शवत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व ३० नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. समितीचे नेतृत्व स्वतः आमदार सत्यजित तांबे करत आहेत. नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे किंवा डॉ. मैथिली तांबे यांच्यापैकी अखेर डॉ. मैथिली तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. समितीने विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला असून, निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचे चित्र आहे.

महायुतीचा गुंता कायम, उमेदवार अखेर निश्चित

दुसरीकडे, महायुतीकडून उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांच्या नावावर एकमत होताना दिसत नव्हते, त्यामुळे त्यांचा अंतर्गत गुंता अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिला. महायुतीने केवळ नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा संदीप खताळ यांचे नाव निश्चित केले, मात्र नगरसेवकपदाच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही.

या निवडणुकीतून विखे-पुत्रांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाल्याचे दिसले. नावे निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सुकाणू समितीचाही फारसा प्रभाव पडला नसल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते.

संगमनेरमधील ही मुख्य लढत अत्यंत लक्षवेधी ठरली असून, दोन्ही बाजूने मोठे राजकीय बळ पणाला लागले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ला संगमनेरकर बहुमत देतात, की महायुतीच्या उमेदवाराला संधी मिळते, याचा फैसला ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

‘संगमनेर सेवा समिती’चे जाहीर झालेले उमेदवार (नगराध्यक्ष आणि नगरसेवक) – 

नगराध्यक्ष पदासाठी डॉ. मैथिली सत्यजित तांबे 

प्रभाग १ अ – खटाटे सिमा महेश

प्रभाग १ ब – पुंड दिलीप सहदेव

प्रभाग २ अ – बोऱ्हाडे भारत चंद्रभान

प्रभाग २ ब – दिघे अर्चना सुभाष 

प्रभाग ३ अ – कासार सौरभ विवेक

प्रभाग ३ ब – शोभा बाळासाहेब पवार 

प्रभाग ४ अ – काशीद प्राची भानुदास

प्रभाग ४ ब – पवार किशोर हिरालाल 

प्रभाग ५ अ – सातपुते अनुराधा निलेश

प्रभाग ५ ब – मुर्तडक विश्वास रतन 

प्रभाग ६ अ – वनिता संजय गाढे 

प्रभाग ६ ब – गजेंद्र बजाबा अभंग 

प्रभाग ७ अ – डाके मालती धनंजय

प्रभाग ७ ब – अभंग नितीन बाजीराव 

प्रभाग ८ अ – पंचारिया दिपाली जीवन

प्रभाग ८ ब – गुंजाळ श्री गणेश रंगनाथ 

प्रभाग ९ अ – पठाण अमजदखान उमरखान

प्रभाग ९ ब – गुंजाळ विजया जयराम 

प्रभाग १० अ – बेग शकीला इलियास बेग 

प्रभाग १० ब – शेख नूरमोहम्मद पीरमोहम्मद

प्रभाग ११ अ – पगडाल सरोजना संदीप

प्रभाग ११ ब – खान शहनवाज रईस 

प्रभाग १२ अ – टोकसे किशोर बद्रीनारायण

प्रभाग १२ ब – शाह प्रियंका श्रीपाल 

प्रभाग १३ अ – कतारी कविता अमर

प्रभाग १३ ब – शैलेश श्रीगोपाल कलंत्री

प्रभाग १४ अ – गरुडकर नंदा मुकुंद

प्रभाग १४ ब – पवार प्रसाद जयवंत 

प्रभाग १५ अ – मुजीबखान अब्दुल्लाखान पठाण

प्रभाग १५ ब – पठाण नसीमबानो इसहाकखान

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!