Sat. May 30th, 2026

संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (21 नोव्हेंबर) मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवक सदस्यपदासाठी 36 अशा एकूण 43 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीतील सर्वात मोठी आणि निर्णायक घडामोड म्हणजे राज्यभर एकीचा नारा देणाऱ्या महायुतीमध्ये संगमनेरमध्ये फूट पडली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका भगत मेधा दीपक यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ श्रीमती सुवर्णा संदीप खताळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. माजी नगरसेविका तवरेज सुषमा संजय यांनीही अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

नगराध्यक्षपदासाठी माघार घेणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सुजाता राजेंद्र देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली कपिलेश्वर पवार यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवार असलेल्या केसेकर सुनीता कैलास, गलांडे रेखा संपत, बेपारी शबाना रईस, डॉ. रूपाली संग्राम जोंधळे आणि शेख अफसाना इलियास यांनीही अर्ज मागे घेतले आहेत.

या सात उमेदवारांच्या माघारीमुळे आता निवडणुकीच्या मैदानात नगराध्यक्षपदासाठी एकूण 8 महिला उमेदवार कायम आहेत. यामध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉककडून तांबे मैथिली सत्यजित, शिवसेनेकडून श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ श्रीमती सुवर्णा संदीप खताळ, आणि अपक्ष म्हणून बंडखोर भगत मेधा दीपक, माजी नगरसेविका तवरेज सुषमा संजय, तसेच सय्यद आलिया शौकतआली, शेख तबस्सुम मोहम्मद शरीफ, आलिशा असलम शेख आणि शेख बानोबी लियाकत यांचा समावेश आहे.

सदस्यपदासाठी अर्ज मागे घेणाऱ्या 36 उमेदवारांची प्रभागनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे.

प्रभाग 1 अ: ढोले अश्विनी सतीश आणि फड वैष्णवी संजय.

प्रभाग 2 ब: दिड्डी रूपाली अभिजीत.

प्रभाग 3 ब: सुनंदा मच्छिंद्र दिघे.

प्रभाग 4 अ: कडलग विद्या प्रकाश आणि गायकवाड चंद्रकला शंकर.

प्रभाग 4 ब: आहेर सतीश भाऊसाहेब.

प्रभाग 5 ब: पवार किशोर सावळेराम.

प्रभाग 6 ब: कानकाटे सोमनाथ सदाशिव, भुजबळ संतोष रमेश आणि राहुल देवराम म्हस्के.

प्रभाग 7 ब: कोठवळ आशिष तुकाराम, भरीतकर माधव त्रिंबक, मंडलिक किशोरी सुभाष आणि शिंदे नारायण सावळेराम.

प्रभाग 8 अ: अरगडे प्रीती अनुज.

प्रभाग 8 ब: कुक्कर भगवान रामदास.

प्रभाग 9 अ: सय्यद अमजद दाऊद.

प्रभाग 9 ब: शेख मुस्कान मुजफ्फर.

प्रभाग 10 अ: शेख दिलशाद अजीज.

प्रभाग 10 ब: इनामदार एजाज जमील.

प्रभाग 11 अ: जहागीरआली जावेदआली सय्यद, शेख रईस मुख्तार, शोयब मुजीब शेख आणि सय्यद अन्सार मकबूल.

प्रभाग 12 अ: बेपारी शफी हाजीपापाभाई आणि बेपारी तबरेज मो. रफीक.

प्रभाग 12 ब: अमृतवाड दीपा व्यंकटेश.

प्रभाग 13 अ: घोगले रूपाली विजय आणि जेधे सुनीता कुंदन.

प्रभाग 13 ब: उपरे मुकुंद मुरलीधर, डुकरे अमोल राजेंद्र आणि वाडेकर प्रशांत पद्माकर.

प्रभाग 14 ब: पवार अकील नजीरखान.

प्रभाग 15 अ: मोमीन जैद जुनेद.

प्रभाग 15 ब: शेख जुलेखा फैरोज.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!