Sat. May 30th, 2026

संगमनेर: गेल्या ३५ वर्षांपासून असलेले आपले निर्विवाद वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यात थोरात-तांबे गटाला पुन्हा एकदा यश आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर शहर विकास सेवा समिती’ने ३० पैकी २७ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी तब्बल १६,४०८ मतांच्या फरकाने विजयी होत राज्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात ही मतमोजणी पार पडली. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

नगराध्यक्षपदाचा निकाल

विजयी: डॉ. मैथिली तांबे (सेवा समिती) – २८,३९७ मते.

पराभूत: सुवर्णा खताळ (महायुती) – ११,९८९ मते.

प्रभागनिहाय सविस्तर निकाल (विजयी आणि पराभूत उमेदवार):

प्रभाग क्र. १

विजयी: सीमा महेश खटाटे (१४६७ मते – सेवा समिती), पराभूत: मनीषा शेखर नेवासकर (९०२ मते – शिवसेना)

विजयी: दिलीप सहदेव पुंड (१४५९ मते – सेवा समिती), पराभूत: अभिजीत उर्फ मुन्ना पुंड (१०८१ मते – शिवसेना)

प्रभाग क्र. २

विजयी: भारत चंद्रभान बोऱ्हाडे (१४२१ मते – सेवा समिती), पराभूत: रवींद्र सोपान बोराडे (६५४ मते – शिवसेना)

विजयी: अर्चना सुभाष दिघे (११२३ मते – सेवा समिती), पराभूत: इंदिरा शशांक नामन (७६७ मते – शिवसेना)

प्रभाग क्र. ३

विजयी: सौरभ विवेक कासार (९६५ मते – सेवा समिती), पराभूत: मिलिंद बाबुराव अभंग (५०७ मते – अपक्ष)

विजयी: शोभा पवार (११५२ मते – सेवा समिती), पराभूत: मंगल बाबुराव वर्पे (७०६ मते – भाजप)

प्रभाग क्र. ४

विजयी: प्राची अमोल कवडे (१४१२ मते – सेवा समिती), पराभूत: कविता दिनेश फटांगरे (८७१ मते – शिवसेना)

विजयी: किशोर पवार (१५६४ – सेवा समिती), पराभूत: प्रवीण सिद्राम दिड्डी (६३८ – शिवसेना)

प्रभाग क्र. ५

विजयी: डॉ. अनुराधा सातपुते (१२९७ मते – सेवा समिती) | पराभूत: संगीता भारत गवळी (८३६ मते – शिवसेना)

विजयी: विश्वास मुर्तडक (१३८१ मते – सेवा समिती), – रवींद्र म्हस्के (९४८ मते – शिवसेना)

प्रभाग क्र. ६

विजयी: वनिता संजय गाडे (१३९२ मते – सेवा समिती), पराभूत: शोभा सुनील घुले (५०३ मते – भाजप)

विजयी: गजेंद्र अभंग (१४७२ मते – सेवा समिती), पराभूत: राहुल नंदकुमार भोईर (७२७ मते – शिवसेना)

प्रभाग क्र. ७

विजयी: मालती धनंजय डाके (१६३५ मते – सेवा समिती), पराभूत: पुनम धोंडीबा अनाप (६३४ मते – शिवसेना)

विजयी: नितीन अभंग (१०७७ मते – सेवा समिती), पराभूत: अमित पंढरीनाथ मंडलिक (८३७ मते – भाजप)

प्रभाग क्र. ८

विजयी: दिपाली जीवन पंचरिया (१२८१ मते – सेवा समिती), पराभूत: पायल आशिष ताजणे (९८९ मते – भाजप)

विजयी: श्रीगणेश गुंजाळ (९३६ मते – सेवा समिती), पराभूत: साकी बागवान (७९९ मते – अपक्ष)

प्रभाग क्र. ९

विजयी: अमजद पठाण (२१९० मते – सेवा समिती), पराभूत: ॲड शरीफ शेख (७४६ मते – अपक्ष)

विजयी: विजया गुंजाळ (११५९ मते – सेवा समिती), पराभूत: आयेशा कबीर देशमुख (९०६ मते – अपक्ष)

प्रभाग क्र. १०

विजयी: शकिला (१३३१ मते – सेवा समिती), पराभूत: गुलाम साबीर कुरेशी (१११० मते – अपक्ष)

विजयी: शेख नुरमोहम्म्द (२०१६ मते – सेवा समिती), पराभूत: शादाब मुस्ताक शेख (६०३ मते – अपक्ष)

प्रभाग क्र. ११

विजयी: सरोजना पगडाल (१९७९ मते – सेवा समिती), पराभूत: राशी दा अब्दुल कुरेशी (५६० मते – अपक्ष)

विजयी: डॉ. दानिश खान (१५३७ मते – सेवा समिती), पराभूत: जावेद जहागीरदार (१४११ मते – अपक्ष)

प्रभाग क्र. १२

विजयी: किशोर टोकसे (२२२६ मते – सेवा समिती), पराभूत: उमेश बाळासाहेब ढोले (७५६ मते – शिवसेना)

विजयी: शाह प्रियंका (२०९० मते – सेवा समिती), पराभूत: पुनम शशिकांत दायमा (९६२ मते – भाजप)

प्रभाग क्र. १३

विजयी: साक्षी विनोद सुर्यवंशी (१४०६ मते – शिवसेना), पराभूत: कविता अमोल कतारी (१०३५ मते – सेवा समिती)

विजयी: शैलेश कलंत्री (१३०३ मते – सेवा समिती), पराभूत: सागर नारायण भोईर (१०८४ मते – भाजप)

प्रभाग क्र. १४

विजयी: नंदा गरूडकर (१५५४ मते – सेवा समिती), पराभूत: नीता सिताराम मोहरीकर (११६९ मते – भाजप)

विजयी: योगेश उर्फ चिकू जाजू (१२९६ मते – अपक्ष), पराभूत: प्रसाद जयवंत पवार (१०४२ मते – सेवा समिती)

प्रभाग क्र. १५

विजयी: मुजीबखान पठाण (२५४८ मते – सेवा समिती), पराभूत: जावेद शेख (६८३ मते – अपक्ष)

विजयी: शेख दिलशाद (१७८१ मते – अपक्ष), पराभूत: नसीमबानो इसाकखान पठाण (८७२ मते – सेवा समिती)

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!