Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत ‘संगमनेर सेवा समिती’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी आज या नावांची अधिकृत घोषणा केली असून, यामध्ये शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, धडाडीचे कार्यकर्ते जावेद पठाण आणि सामाजिक कार्यकर्त्या रचना मालपाणी यांची वर्णी लागली आहे.

या निवडीबाबत माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, ‘संगमनेर २.०’ चा जाहीरनामा आणि शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली होती, ज्याला ७० टक्के मतदारांनी कौल दिला आहे. कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने स्वीकृत पदासाठी निवड करणे कसरत होती. यामध्ये संघटनात्मक कार्यासाठी सोमेश्वर दिवटे यांना पहिली संधी देण्यात आली असून, दुसरे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी ज्येष्ठतेचा मान राखत त्यांना समर्थन दिले. दुसरी जागा सेवा समितीमध्ये सुरुवातीपासून सक्रिय असलेले जावेद पठाण यांना, तर तिसरी जागा सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी रचना मालपाणी यांना देण्यात आली आहे.

स्वीकृत सदस्यांसाठीचे अर्ज आज दाखल करण्यात आले असून, उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या बैठकीत त्यांची अधिकृत निवड जाहीर होईल. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात असून उद्या सकाळी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सर्व नगरसेवकांशी चर्चा करून हे नाव निश्चित केले जाईल. तसेच येत्या १० दिवसांत विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी देखील पूर्ण केल्या जातील, असेही आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!