Sat. May 30th, 2026

संगमनेर:

शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी थेट ‘फिल्ड’वर उतरून पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी निळवंडे धरणापासून शहरापर्यंत येणाऱ्या मुख्य जलवाहिनीची आणि धरणाजवळील महत्त्वपूर्ण बॉल व्हॉल्व्हची प्रत्यक्ष पाहणी करत तांत्रिक सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी कामातील त्रुटी दूर करून यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या.

पाणीपुरवठा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेचीही त्यांनी विशेष पाहणी केली. यानंतर नगरपरिषदेच्या पंपिंग स्टेशनला भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून, शहराचा सर्वांगीण विकास आणि मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे मैथिली तांबे यांनी नमूद केले. पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रशासकीय कामांना वेग देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजीब खान पठाण, अभियंता अमृत काजवे, विविध नगरसेवक आणि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आगामी काळात संगमनेरकरांना पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासन आता युद्धपातळीवर कामाला लागले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!