Sat. May 30th, 2026

संगमनेर :

मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याच्या घटनेचे समर्थन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी संगमनेर बसस्थानक परिसरात शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याचे सांगत, त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नसल्याची भावना व्यक्त केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे हे विधान महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारे असून, यामुळे प्रत्येक शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मालेगावमधील फोटो प्रकरणामुळे आधीच तणाव असताना, जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे विधान करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

निषेध आंदोलनामध्ये नीलम खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडत महायुतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!