Sat. May 30th, 2026

संगमनेर:

शाळेसारख्या पवित्र मंदिरात सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग करून तिला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दत्तु किसन कौटे या शिक्षकाला संगमनेर न्यायालयाने कठोर अद्दल घडवली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांनी या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पीडितेला न्याय मिळाला आहे.

श्रमशक्ती माध्यमिक विद्यालयात फेब्रुवारी २०२५ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित शिक्षिकेने पतीच्या वाढदिवसाचा पुष्पगुच्छ शाळेत आणल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपीने वाद घातला होता. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी आरोपीने शाळेच्या रंगमंचावर भर विद्यार्थ्यांसमोर पीडितेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आणि जोरात चापट मारली. या हल्ल्यामुळे पीडित शिक्षिका बेशुद्ध पडली होती. संगमनेर तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्यात सरकारी अभियोक्ता श्रीमती पायल बी. एखंडे यांनी मांडलेला युक्तिवाद आणि सात साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये आरोपीला शिक्षा सुनावतानाच, दंडाची १० हजार रुपयांची रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!