Sat. May 30th, 2026

संगमनेर:

संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार असून, येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करून पुढच्या वर्षीची शिवजयंती याच ठिकाणी साजरी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पासोबतच बसस्थानक परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, संविधान स्मारक आणि १०० फूट उंचीचा भव्य तिरंगा उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीदरम्यान आमदार तांबे बोलत होते. ढोल-ताशांचा गजर आणि मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने सजलेल्या या मिरवणुकीत नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते.

नगरपरिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण संगमनेर नगरी शिवमय झाली होती.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!