Sat. May 30th, 2026

संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील सुमारे ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपये पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच हिवरगाव पावसा येथील निळवंडे प्रकल्प अंतर्गत उर्ध्व प्रवरा उजवा कालवा (सा. क्र. ३५७३०) येथे सुमारे १ कोटी.३२ लाख रुपयांच्या सी.आर. एस्केप कामाचे लोकार्पण होणार आहे.या शिवाय पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वरील रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द दरम्यान उभारण्यात आलेल्या पथदिव्यांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंदनापुरी, हिवरगाव पावसा, रायतेवाडी आणि संगमनेर खुर्द येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!