संगमनेर:
छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आणि वारसा जपण्यासाठी संगमनेर शहरात यंदाचा शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’च्या नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी विनायक गरूडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ‘आपली समिती, आपली ताकद’ हे ब्रीदवाक्य घेऊन ही समिती कार्यान्वित झाली आहे.
समितीच्या उपाध्यक्षपदी हर्षल जेधे व विजय चव्हाण, कार्याध्यक्षपदी किरण वर्पे तर सह कार्याध्यक्षपदी रोशन गोफणे यांची नियुक्ती झाली आहे. सेक्रेटरी म्हणून दत्तु थोरात आणि सह सेक्रेटरी म्हणून सिद्धार्थ दुशिंग काम पाहणार आहेत. आर्थिक नियोजनासाठी खजिनदार सौरभ उमर्जी व सह खजिनदार शुभम येरमल यांची निवड करण्यात आली आहे. कायदेविषयक सल्लागार म्हणून शोण थोरात व सुशांत कवडे मार्गदर्शन करतील. संघटनेची धुरा शहर संघटक विशाल पवार, सह शहर संघटक विशाल बोह्हाडे, तालुका संघटक प्रसाद आव्हाड आणि सह तालुका संघटक चंदु शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
उत्सवाच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प प्रमुख म्हणून मंगेश पाथरकर तर सह प्रकल्प प्रमुख म्हणून महेंद्र भालारे व राज तायडे यांची वर्णी लागली आहे. सोहळ्याच्या प्रसिद्धीची जबाबदारी साईराज बोप्पा, मयुर आडेप, हित कलंत्री आणि ओम दर्वे ही चमू सांभाळणार आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून यंदाची शिवजयंती विचारांची आणि शिस्तीची जत्रा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


