Sat. May 30th, 2026

संगमनेर:

संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता, लोकवर्गणी आणि विविध स्थानिक निधींच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा निर्धार आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे.

नगरपरिषदेच्या वतीने स्मारकाच्या स्वरूपाबाबत आयोजित ‘नागरिक मत नोंदणी’ अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार तांबे यांनी स्मारकाच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी या स्मारकासाठी २०१8 पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून स्मारकासाठी जागा मंजूर करून घेण्यात आली. सध्या स्मारकाची अचानक मागणी करणाऱ्या विरोधकांना या प्रक्रियेचा विसर पडला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

स्मारकाच्या स्वरूपाबाबत पारदर्शक निर्णय घेण्यासाठी नगरपरिषदेने ‘अश्वारूढ स्मारक’, ‘भव्य उभे स्मारक’ आणि ‘सिंहासनाधीश्वर पूर्णाकृती स्मारक’ असे तीन पर्याय नागरिकांसमोर ठेवले आहेत. लोकशाही मार्गाने राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ६,११३ नागरिकांनी आपला कल नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

नागरिकांच्या बहुमताचा आदर करूनच स्मारकाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिले. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!