Sat. May 30th, 2026

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘जीवनदान श्रेष्ठदान’ उपक्रम यशस्वी

संगमनेर: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) यांच्यावतीने संगमनेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान श्रेष्ठदान या उदात्त हेतूने आयोजित हे शिबिर शुक्रवारी (दिनांक ३१ ऑक्टोबर) यशस्वीपणे पार पडले, याला संगमनेरवासीयांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘जीवनदानाचा संकल्प’ करत राहुल गांधी समर्थक संघाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता. शिबिरादरम्यान नवीन नगर रस्त्यावरील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिबिर स्थळी भेट देऊन आयोजकांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

संगमनेर येथील बस स्टॅन्ड परिसरात सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराला परिसरातील युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.

या शिबिरात अर्पण या नामांकित रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. रक्त संकलनासोबतच, रक्तदात्यांची मोफत रक्तगटाची चाचणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली, यामुळे नागरिकांना आरोग्याची माहिती मिळाली.

राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राम अरगडे, मोहसीन रशीद शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, प्रदीप धाडीवाल, अरुण गावित्रे, कल्याण जोर्वेकर, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, शशी माघाडे, ॲड. अमित सोनवणे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव, मोहसीन खलील शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व आयोजकांनी सहभागी रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे विशेष आभार मानले.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!