Sat. May 30th, 2026

संगमनेर –

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (रा. ठाणे) यांचे कोल्हेवाडी येथील घर १३ ते १८ जानेवारी दरम्यान बंद असताना ही चोरी झाली. चोरट्यांनी तार कंपाउंड कापून आणि खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे आणि पेटीचे लॉक तोडून प्रत्येकी १० ग्रॅमची सोन्याची दोन नाणी, सोन्याची चैन आणि रोख रक्कम असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!