Sat. May 30th, 2026

शिर्डी:

राजकीय उलथापालथीच्या काळातही पक्षाची साथ न सोडणाऱ्या निष्ठावंतांच्या बळावर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. सर्व गट-तट विसरून शिवसैनिकांची वज्रमूठ सहाही तालुक्यांत पक्षाचा भगवा फडकवेल, असा एल्गार नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या निर्धार बैठकीत करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित कार्यकारिणीची निर्धार बैठक आणि सत्कार सोहळा शिर्डी येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीरामपूरचे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा यांनी भूषवले. या बैठकीच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील आणि जगदीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभेतील ठाकरे गटाची शिवसेना आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनी संघटनात्मक बदलाचा जो प्रयोग केला आहे, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील म्हणाले की, अकोले, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर यांसारख्या महत्त्वाच्या तालुक्यांत गेल्या दोन-दोन दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंतांना आता महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. ही नवी फळी प्रत्येक गटात आणि गणात निवडणूक नियोजनासाठी सज्ज असून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना मोठ्या ताकदीनिशी उतरणार आहे.

जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर, बाळासाहेब जाधव, प्रमोद अण्णा लबडे, नाना बावके, लखन भगत, संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, कोपरगाव विधानसभा संपर्कप्रमुख आशुतोष मार्कंडे आणि उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनीही आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या सोहळ्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, संगमनेर तालुकाप्रमुख (पश्चिम) भाऊसाहेब हासे, तालुकाप्रमुख (पूर्व) भीमाशंकर पावसे, विधानसभा प्रमुख योगेश खेमनर, शहरप्रमुख अमित चव्हाण आणि फैसल सय्यद, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, विधानसभा संघटक दिपक साळुंके, शहर संघटक आसिफ तांबोळी, वाहतूक सेना (रिक्षा सेना) तालुकाप्रमुख अशोक बडे, वाहतूक सेना शहरप्रमुख माघाडे, तालुकाप्रमुख (अश्वि मंडल) प्रकाशराजे गायकवाड, बोटा मंडलप्रमुख अमित फटांगरे, युवासेना (पठारभाग) तालुकाप्रमुख लखन सोन्नर, युवा तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना विधानसभाप्रमुख अमोल डुकरे आणि तालुकासंघटक मच्छिंद्र दिघे यांचा समावेश होता.

तसेच उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारलेले सचिन दिघे, राजाभाऊ सातपुते, बाळासाहेब हासे, रवी गिरी, भाऊसाहेब वराळे, त्र्यंबक शिंदे, अरुण भालेराव, एकनाथ खेमनर, संजय सोनवणे, कैलास नवले आणि गोकुळ लांडगे यांचाही सत्कार करण्यात आला. व्यापारी आघाडीचे शहरप्रमुख संभव लोढा, उपशहरप्रमुख रहिम बेग, परवेझ शेख, मुकेश काठे, प्रविण चव्हाण, दीपक वन्नम, जितेंद्र दर्वे, अनिल खुळे यांच्यासह महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आशा केदारी, संगीता गायकवाड आणि वैशाली वडतले यांनाही सन्मानित करण्यात आले. या मेळाव्यामुळे शिर्डी लोकसभा क्षेत्रात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला मोठी गती मिळाली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!