Sat. Jun 13th, 2026

पिक विमा नुकसान भरपाईसाठी संगमनेरमध्ये शेतकरी करणार आंदोलन

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान भरपाई न मिळाल्यास थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गत खरीप हंगामातील पीकविमा भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये वाटप झाली असताना, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना…

खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू; तिगाववर शोककळा

संगमनेर: तालुक्यातील तिगाव येथे शुक्रवारी (दि. २२) संध्याकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.…

संगमनेरमध्ये रविवारी ह.भ.प. विकास लवांडे यांचे ‘संतांचा वारकरी संप्रदाय’ या विषयावर व्याख्यान

संगमनेर: येथील सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प रविवारी गुंफले जाणार आहे. या निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. विकास लवांडे यांचे ‘संतांचा वारकरी संप्रदाय’ या विषयावर व्याख्यान आयोजित…

आमदार अमोल खताळ यांची वडगाव पान येथील आरटीओ कॅम्पवर अचानक धाड; सर्वसामान्य वाहनचालकांची अडवणूक खपवून घेणार नाही, अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग, श्रीरामपूरच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष आरटीओ कॅम्पमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांनी बुधवारी अचानक धाड टाकली. या कॅम्पमध्ये एजंटांमार्फत…

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगमनेरमध्ये व्यंगचित्र स्पर्धा उत्साहात; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

संगमनेर: हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख तथा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या (उबाठा) वतीने भव्य व्यंगचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी,…

संगमनेरमध्ये तीन सराईत गो-तस्करांवर नवीन कायद्यानुसार ‘संघटित गुन्हेगारी’ अंतर्गत कडक कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांची मंजुरी

संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तल करणाऱ्या एका सराईत टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संगमनेरच्या जमजम कॉलनीतील तीन मुख्य आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता…

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: बाळासाहेब थोरात

संगमनेर: अनेक अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण केले असून, या धरणातील ६० टक्के पाणी संगमनेर तालुक्याच्या हक्काचे आहे. त्यामुळे तालुक्याला त्याचे हक्काचे पाणी आणि न्यायालयाच्या…

पठार भागातील रस्ते निधी बाळासाहेब थोरातांच्या काळातीलच; श्रेय लाटण्याचा प्रकार थांबवा: मीराताई शेटे

संगमनेर: साकुर पठार भागातील विविध रस्ते कामांसाठी मंजूर झालेला सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच कार्यकाळातील असून, नवीन लोकप्रतिनिधींनी आयत्या पिठावर रेघोट्या मारून याचे श्रेय…

कायदेशीर देणे सिद्ध करण्यात फिर्यादी अपयशी; न्यायालयीन लढाईत आरोपी संतोष काळे निर्दोष

संगमनेर: एका महत्त्वपूर्ण फौजदारी खटल्यात ‘चेक बाऊन्स’ प्रकरणी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून उधारीपोटी मिळालेला तीन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याचा दावा फिर्यादीने केला होता, मात्र…

…अन् ‘निलायम बार’मधील चोरी महागात पडली; ५ जणांना बेड्या, ५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: संगमनेरसह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेल्सचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या…

error: Content is protected !!