Sat. May 30th, 2026

आळेफाटा: 

शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन परतणाऱ्या धांदरफळ (ता. संगमनेर) येथील एका तरुणाला नियोजनाच्या वादातून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ एप्रिल रोजी मनोज खुरपे व त्यांचे सहकारी पायी दिंडीने परतत असताना, आळे रोडवर आरोपींनी त्यांना अडवले. नियोजनाचे अधिकार तुला कोणी दिले? असा जाब विचारत आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, वायरने आणि काठीने मनोज खुरपे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीची सोन्याची चैनही गहाळ झाली.

मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकीही दिली. मनोज खुरपे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत कोल्हे, ओमकार तोरकडी, संतोष शिंदे, प्रविण शिंदे, विशाल कोल्हे, कौस्तुभ बिडवे, आशिष कोल्हे, निखिल जाधव, विकास कोल्हे, कार्तिक कोल्हे आणि एक अनोळखी इसम अशा एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलीस अधिक तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!