Sat. May 30th, 2026

अकोले:
श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध दारूची वाहतूक करणारा ‘छोटा हत्ती’ टेम्पो जप्त केला आहे. अकोले ते धामणगाव पाट रोडवरील पाझर तलावाजवळ शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ६४ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संगमनेरकडून कोतूळ परिसराकडे एका मालवाहू गाडीतून (क्र. एम.एच.१७ सी.व्ही. ४१६२) बेकायदेशीर दारू नेली जात होती. पोलिसांनी सापळा रचून ही गाडी अडवली असता, त्यात २ लाख ५९ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या २६८८ बाटल्या सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी विशाल पोपट निळे आणि राजेंद्र बाळासाहेब तांबे या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ही दारू संगमनेर येथील उमेश सूर्यवंशी याच्याकडून खरेदी करून अक्षय मारुती वाकचौरे याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी नेली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दारूसाठा, दोन मोबाईल आणि टेम्पो असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात विशाल निळे आणि राजेंद्र तांबे यांना अटक करण्यात आली असून, अक्षय वाकचौरे व उमेश सूर्यवंशी हे दोन आरोपी सध्या फरार आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!