Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्यातच थेट घुसून बेकायदेशीर जमाव जमवल्याबद्दल, पोलीस अंमलदाराच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याबद्दल सहा निष्पन्न आरोपींसह एकूण १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण हासे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये सागर बागे, सुरज बागे, ऋषी आव्हाड, सागर पगारे, मनोज पगारे, सनी धारणकर यांचा समावेश आहे. या सहा आरोपींव्यतिरिक्त इतर ०६ अनोळखी अशा एकूण १२ जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

बुधवारी (२२ ऑक्टोबर) रात्री ८.०० वाजेपासून ते गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंतच्या दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गंभीर घटना घडली. फिर्यादी योगेश हासे हे त्यांच्या केबिनमध्ये शासकीय काम करत असताना, आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून पोलीस ठाणे अंमलदार यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला.

आरोपींनी केबिनमध्ये मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. फिर्यादी हासे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांच्यासमोर दंगा सुरू केला. एवढेच नाही, तर त्यांनी तक्रारदार योगेश हासे यांना बसण्यासाठी असलेली काळ्या रंगाची खुर्ची ढकलून दिली आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केली. आरोपींच्या या कृत्यांमुळे फिर्यादींना त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

याप्रकरणी पो.हे.कॉ. योगेश लक्ष्मण हासे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९४४/२०२५ अन्वये आरोपींविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम २२१, ३५२, ३५१(२), १८९(१), १८९(२), १९४(२), २९६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११२ आणि ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस पुढील तपास करत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!