Sat. May 30th, 2026

संगमनेर – प्रतिनिधी

निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच संगमनेरच्या भारतनगर भागात दहशतीचा थरार पाहायला मिळाला. नवनिर्वाचित नगरसेवक नूर महंमद शेख यांच्या विजयी मिरवणुकीत “इनको बाहर खिचो और मारो” अशा चिथावणीखोर घोषणा देत एका कुटुंबावर लोखंडी रॉड, चॉपर आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास फिर्यादी रिक्षाचालक मुजीब शमशुद्दीन शेख (वय ४०, रा. भारतनगर) हे घरी असताना ही घटना घडली. नवनिर्वाचित सदस्य नूर महंमद शेख यांची मिरवणूक फिर्यादींच्या घरासमोर आली असता जमाव हिंसक झाला.

या टोळक्याने मुजीब शेख, जोया, मेहरान, इशज आणि साद यांना घेरून बेदम मारहाण केली. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात मुजीब शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुजीब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी सलीम हाजी शेख, नगरसेवक नूर महंमद शेख, इमरान गणेश शेख, शैजाज सलीम शेख, दानिश सलीम शेख, सलमान सलीम शेख, वसीम अब्दुल रहमान शेख, उमेर अलीम हाजी, जमील अजीज पठाण, ययाखान समशेरखान पठाण, अदनान शाहिद शेख, जिशान शाहिद शेख, सरजील मोहम्मद शेख, अलीम हाजी शेख, नईम रहमान शेख, तलहा कलीम शेख आणि रिजवान उस्मान शेख या १७ जणांविरुद्ध गुन्हा (रजि. नं. ११०१/२०२५) दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. आरोपींविरुद्ध बी.एन.एस. कलम ११८, १९१(१), १९१(२), १९१(३), ३५१(२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!