Sat. May 30th, 2026

अहिल्यानगर: शिर्डी परिसरात दहशत माजवणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (४५) याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात तो फरार होता.

४ नोव्हेंबर २०२५ रोजी सावळविहीर रस्त्यावर निलेश दीपक जाधव या तरुणाला पाप्या आणि त्याच्या साथीदारांनी अडवले होते. भररस्त्यात पिस्तूल रोखून त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या खळबळजनक प्रकारानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीचा माग काढण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तैनात केले होते. २६ डिसेंबर रोजी पाप्या शेख हा शिर्डीतील हॉटेल रेणुकाजवळील काटवनात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘शार्प’ पथकाने पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक दीपक मेढे, सागर काळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. आरोपीला पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!