Sat. May 30th, 2026

संगमनेर –
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारात प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १२:४५ च्या सुमारास पिंपरणे येथील पुलाजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या एकूण ७ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये सुरज संजय पवार (रा. घुलेवाडी), विशाल राजू रणशूर (रा. घुलेवाडी), ऋषीकांत कारभारी वर्षे (रा. कनोली), संतोष पंढरीनाथ भवर (रा. जोर्वे), शशिकांत शिवाजी नागरे (रा. मालुंजे), ताहीर सुलतान शेख (रा. डिग्रस) आणि अविनाश अनिल मिसाळ (रा. घुलेवाडी) यांचा समावेश आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ६० लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने टाटा कंपनीचा टिप्पर (क्र. MH-17-CV-4063), पिवळ्या रंगाचे जेसीबी मशीन (क्र. MH-15-JM-4010), महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर, लोखंडी फरांडी व साखळी आणि टिप्परमध्ये असलेली २ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!