Sat. May 30th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील निळवंडे येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

फिर्यादी बाळासाहेब दादा आव्हाड हे नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेर गेले असताना, २ ते ३ फेब्रुवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील बॅगेत ठेवलेली २३,००० रुपयांची रोकड तसेच १६,५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ३९,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. लग्न आटोपून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या तक्रारीवरून पोलिसांनी बी.एन.एस. कलम ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!