Sat. May 30th, 2026

संगमनेर:

शांतताप्रिय संगमनेर शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजापूरच्या गुंजाळवाडी रस्त्यावरील लक्ष्मीनगर आणि कुरण भागात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ९९७ ग्रॅम सुका गांजा जप्त केला असून, यामुळे नशेच्या छुप्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. मुन्ना अब्बास शेख (वय २६) आणि संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर (वय २६) अशी आरोपींची नावे आहेत.

काही तरुण संशयास्पदरीत्या अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांच्या फिर्यादीवरून अमली औषधे द्रव्य मन:प्रभावी पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठेपर्यंत पसरले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!