Sat. May 30th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील चिखली शिवारात महार वतन इनाम जमिनीवर बेकायदेशीरपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर येथील एका महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली असून, अरविंद सोमनाथ हासे (रा. चिखली) आणि प्रतीक भाऊसाहेब भोकनळ (रा. मंगळापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत.

फिर्यादीच्या मालकीची चिखली येथील जमीन वर्ग-२ ची असताना, जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या ठेकेदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खासगी शेतजमिनीत कायमस्वरूपी बांधकाम करून नुकसान केले. चिखली ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या निधीचा वापर करून हे अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले.

याप्रकरणी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याने अखेर पीडितेने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल होऊन दहा-अकरा दिवस उलटले तरी आरोपींना अद्याप अटक न झाल्याने तक्रारदार महिलेने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!